हॉस्पिटल विषयी

Home हॉस्पिटल विषयी
General Surgeon in Nashik | Laparoscopic Surgeon in Nashik Hernia Surgeon in Nashik |GallBladder Surgeon in Nashik
General Surgeon in Nashik | Laparoscopic Surgeon in Nashik Hernia Surgeon in Nashik |GallBladder Surgeon in Nashik

सरु हॉस्पिटल

जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान नाशिक शहरामध्ये उपलब्ध

डॉ. सचिन देवरे हे सल्लागार सर्जन आणि लेप्रोस्कोपिक तज्ञ आहेत

डॉ. देवरे हे मूळचे सटाणा तालुक्यातील करंजाड येथील असून त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मालेगाव येथे झाले. एमआयटीच्या तळेगाव, पुणे येथील महाविद्यालयातून एमबीबीएस केल्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये फादर ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी सर प्रोफेसर डॉ. उडवडिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. या काळात भारतातील व परदेशातील अनेक राजकीय , क्रीडा , सिनेतारक-तारकांच्या उपचारातील टीमचा ते भाग होते.
त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल, सर एच.एन. हॉस्पिटल या ठिकाणी सेवा देत विविध तज्ज्ञांकडून सर्जरीचे कौशल्य आत्मसात करून घेतले. त्यांनतर त्यांनी होळी क्रॉस हॉस्पिटल, मेघालय व सेंट लुक्स ( जर्मन ) हॉस्पिटल येथे दोन वर्ष कार्यभाग सांभाळला. सुमारे ५ वर्षांपासून ते नाशिकमध्ये कार्यरत असून सरु हॉस्पिटल व निम्स हॉस्पिटल यांचे ते मालक व संचालक आहेत. सह्याद्री हॉस्पिटल, व्होकार्ट हॉस्पिटलसह सुमारे २८ विविध हॉस्पिटलला ते लॅप्रोस्कोपिक व जनरल सर्जन म्हणून सेवा देतात.
आजवर पाच हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रकिया त्यांनी केल्या आहेत. त्यात अनेक किचकट शस्त्रकियांचा समावेश आहे तसेच एकाच रुग्णांत दोन हजाराहून अधिक पित्ताशयाचे खडे काढण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. सर्जरीमध्ये प्रतिष्ठीत व मानाच्या अनेक पदव्या व फेलोशिप त्यांनी संपादन केल्या आहेत. जसे – डीएनबी , एम.एस., मेंबर ऑफ नॅशनल अकॅडमि ऑफ मेडिकल सायन्सेस, फेलोशिप इन मिनिमल ऍक्सेस सर्जरी, फेलोशिप इन ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी , फेलोशिप इन इंडिअन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रो-इंडो सर्जन , अससोसिएटे फेलो इन इंडस्ट्रियल हेल्थ इ.

प्रगत तंत्रज्ञान, यंत्रे आणि सर्जिकल स्किल्सचे परिपूर्ण मिश्रण

नाशिकमधील पित्ताशयातील खड्याचे इलाज करणारे डॉक्टर

गेल्या काही वर्षांमध्ये विज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील आश्चर्यकारक आणि उल्लेखनीय बदल देखील झाले आहेत. काही वर्षापूर्वी शस्त्रक्रिया जटिल वाटली पण आता ते सोपे वाटते. .

सुरुवातीच्या काळात, मोठ्या ऑपरेशनमध्ये अधिक जखमा होत. आणि मोठ्या ऑपरेशन्सवरून डॉक्टर चांगले का वाईट असे ठरवले जायचे. पण आजच्या काळात तसे नाही. विज्ञानाच्या विकासासह, आज एक व्यक्ती अधिक सहजपणे बरा होऊ शकते. डॉ. सचिन देवरेनीं भारताबरोबरच नाशिकमध्येही विविध आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

 गेल्या 5 वर्षांत डॉ. देवरे यांनी हजारो रुग्णांना बरे केले आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा, यंत्रसामग्रीचा आणि सर्जिकल कौशल्यांचा परिपूर्ण संयोजन त्यांच्याकडे आहे.

आधुनिक शस्त्रक्रियेसाठी कोणते पर्याय आहेत?

1) लॅपरोस्कोपिक सर्जरी

2)लेसर सर्जरी.

4) सामान्य सर्जरी

.3) डे केअर शस्त्रक्रिया,

5) एन्डोस्कोपी

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती – जगाच्या कोणत्या कोपऱ्यात नवीन तंत्रज्ञान निर्माण होत ते जास्त महत्वाचे नाही. डॉ. सचिन देवरे यांनी नाशिकला त्यांच्या रुग्णालयात सर्व सेवा उपलब्ध केले आहेत. त्यांच हेतू केवळ एक गोष्ट आहे – उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही रुग्णाने परदेशातल्या सेवांपासून वंचित राहू नये म्हणून हॉस्पिटल मध्ये या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिकमधील पित्ताशयातील खड्यांचे इलाज करणारे डॉक्टर म्हणून डॉ. देवरे प्रसिद्ध आहेत.

डॉ. देवरे यांनी खालील तीन तंत्रज्ञानास एकाच छताखाली उपलब्ध केले आहे -1) कार्ल स्टोरेज एचडी. लॅपरोस्कोपीसाठी जर्मन तंत्रज्ञान. 2) बायोलाईटॅक लेवार्नाडो ड्युअल – 45, जर्मन ला वापरल्या जाणाऱ्या ४५ लेसर प्रक्रिया, आणि 3) ऑलिंपस. एंडोस्कोपीसाठी जपानी तंत्रज्ञान. डॉ. देवरे यांनी असेही नमूद केले आहे की हे तंत्रज्ञान त्यांच्या संबंधित श्रेणीचे सर्वोत्तम मॉडेल आहेत, म्हणून आम्ही जगात कोणाच्याही मागे राहिलेलो नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क साधाः +९१ ८०८७०३००००

Appendix Surgeon in Nashik | appendix cost in nashik Pilonidal Sinus Treatment in Nashik|cholesterol surgeon in nashik
Appendix Surgeon in Nashik | appendix cost in nashik Pilonidal Sinus Treatment in Nashik|cholesterol surgeon in nashik

हॉस्पिटल गॅलरी