एंडोस्कोपी

Home दुर्बीण शस्त्रक्रिया

एंडोस्कोपी

General Surgeon in Nashik | Laparoscopic Surgeon in Nashik Hernia Surgeon in Nashik |GallBladder Surgeon in Nashik

पोटावर बेंबीच्या खाली छोटासा छेद घेऊन यातून विशेष सुई पोटात टाकली जाते. यातून पोटात हवा किंवा कार्बन डायऑक्साइड वायू सोडला जातो. ही सुई काढून येथूनच एक टेलीस्कोप आत टाकतात. टेलीस्कोपला लाइट, कॅमेरा, टीव्ही या बाबी जोडल्या असल्याने सर्व दृश्य टीव्हीवर दिसते. पोटातील इतर सर्व अवयवांची सूक्ष्म पाहणी केल्यानंतर पित्ताशयाच्या पिशवीवर लक्ष केंद्रित केले जाते. शस्त्रक्रियेचे साहित्य आत पोहोचवण्यासाठी तीन छोट्या नळ्या बरगडीच्या खाली सोडल्या जातात. एका नळीतून फोर्सेप व कात्री आत टाकून पिशवी उचलून धरली जाते. पित्ताशयाची नळी वेगळी करून हळहळू पित्ताशयाची पिशवी लिव्हरपासून वेगळी केली जाते. ही पिशवी एका नळीच्या किंवा पोटावरील छेदातून बाहेर ओढून घेतली जाते. यानंतर पुन्हा एकदा लिव्हरच्या बाजूने कोठेही रक्तस्त्राव नसल्याची खात्री केली जाते. नळ्या, दुर्बीण हे साहित्य पोटातून बाहेर काढले जाते. या ठिकाणचे सर्व छेद टाका घेऊन बंद करतात. इथवर शस्त्रक्रिया पूर्ण होते.

 

दुर्बिणीने करता येणा-या शस्त्रक्रिया –

अ‍ॅपेंडिक्स, हर्निया, स्त्री बीजकोशाशी निगडित शस्त्रक्रिया या माध्यमातून करता येतात. पूर्वीच एखाद्या शस्त्रक्रियेत एकमेकाला चिकटलेली आतडीही याद्वारे सोडवता येतात. या दुर्बिणीच्या साहाय्याने गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रियाही पूर्ण केली जाते. जठर, आतडे, फुप्फुस आणि मूत्रपिंडाच्या मोठ्या शस्त्रक्रियाही याआधारे केल्या जातात. पोटात अचानक होणा-या तीव्र वेदना, आतड्याला छिद्र पडून होणारा रक्तस्त्राव अशा तातडीच्या स्थितीत या शस्त्रक्रियेचा फायदा होतो. याआधारे लवकर निदान झाल्याने उपचार करणे सोपे जाते.

 

शस्त्रक्रियेला लागणा-या पूरक गोष्टी –

शस्त्रक्रियेच्या वेळी पोटातील अवयव व्यवस्थित दिसावेत आणि आत नळी टाकताना इजा होऊ नये यासाठी पोटात हवा किंवा कार्बन डायऑक्साइड हा वायू भरावा लागतो. शस्त्रक्रियेदरम्यान पोट फु गवून ठेवले जाते. यासाठी वायूचे प्रमाण व दाब सातत्याने ठेवावा लागतो. यासाठी उपयोगात आशल्या जाणा-या साहित्याला इन्सफ्लेक्टर म्हटले जाते.

 

या शस्त्रक्रियेचे फायदे कोणते ?

• या शस्त्रक्रियेत पोट पूर्ण उघडावे लागत नाही.
• रुग्ण शस्त्रक्रियेनंतर तिस-या दिवशी घरी जाऊ शकतो.
• रुग्णाला औषधे व सलाइन कमी घ्यावे लागतात.
• शक्यतो रक्त देण्याची गरज पडत नाही.
• आतडी एकमेकांना चिकटण्याचे प्रमाण शून्य आहे.